नागपूर हे देशाच्या मध्यभागी असून नागपूरमधे देशाचं हवाई वाहतूक क्षेत्राचं केंद्र बनण्याची क्षमता असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. विकसित भारतामधे हवाई वाहतूक क्षेत्राची भूमिका या विषयावर नागपूरमधे आयोजित परिसंवादात ते बोलत होते. हवाई वाहतूकक क्षेत्राच्या सुरक्षिततेबद्दल कुठलीही तडजोड न करता या क्षेत्राला आत्मनिर्भर करावं असं आवाहन गडकरी यांनी केलं.
Site Admin | October 4, 2025 1:35 PM | Nitin Gadkari
नागपूरमधे देशाचं हवाई वाहतूक क्षेत्राचं केंद्र बनण्याची क्षमता आहे- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
