अन्न आणि औषध प्रशासनानं आज नागपूरमध्ये ४ हजार लिटरहून अधिक बनावट दह्याचा साठा जप्त केला. गुप्त माहितीच्या आधारे केलेल्या या कारवाईत मध्य प्रदेशातल्या जबलपूर इथून आलेले दह्याची २७० पिंपं जप्त करून नष्ट करण्यात आली.
योग्य मानकांचं पालन न करता तयार केलेल्या या दह्याच्या सेवनामुळे ग्राहकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो, हे लक्षात घेऊन प्रशासनानं ही कारवाई केली. जप्त केलेल्या दह्याचे नमुने चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत आणि या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे.