November 10, 2024 3:43 PM | Nagpur

printer

नागपूरमध्ये ३७ लाख ७१ हजार रुपयाचा महागड्या विदेशी मद्याचा साठा जप्त

नागपूरच्या धरमपेठ परिसरात ३७ लाख ७१ हजार रुपये किमतीचा महागड्या विदेशी मद्याचा साठा आणि अन्य मुद्देमाल जप्त केला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने सिताबर्डी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई केली. महाराष्ट्रात विक्रीसाठी प्रतिबंधित असलेला हा मद्यसाठा हरियाणामधून आणल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक करुन त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.