क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या दिडशेव्या जयंतीनिमित्त नागपूर इथं उद्यापासून १७ नोव्हेंबर पर्यंत भव्य जनजातीय गौरव महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. या राज्यपातळीवरच्या महोत्सवाचं उद्घाटन राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते होणार आहे. आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक ऊईके यांनी नागपूर इथं ही माहिती दिली. याचबरोबर राज्यातल्या सुमारे चार हजार ९७५ आदिवासी गावांमध्ये शासनाच्या सर्व विभागामार्फत समग्र विकासासाठी एक व्यापक मोहीम राबवली जात असल्याचंही त्यांनी सांगितलं.
Site Admin | November 14, 2025 3:39 PM | Nagpur
नागपूरमध्ये भव्य जनजातीय गौरव महोत्सवाचं आयोजन