राज्यातल्या २२२ नगरपालिकांसाठी मतदान झालं.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सरासरी ७४ पूर्णांक ३५ शतांश,
जालना जिल्ह्यात ७३ पूर्णांक ७६ शतांश,
हिंगोली नगरपरिषदेसाठी ६६ पूर्णांक २५ शतांश, तर कळमनुरीसाठी ७२ पूर्णांक ८१ शतांश,
लातूर जिल्ह्यात उदगीरमध्ये ६८ पूर्णांक १२ शतांश, अहमदपूरमध्ये ७३ पूर्णांक ६ शतांश, तर औसा इथं ७५ पूर्णांक ७३ शतांश,
कोल्हापूर जिल्ह्यात १० नगरपरिषदा आणि ३ नगरपंचायतींसाठी सरासरी ७८ पूर्णांक ८७ शतांश,
रत्नागिरी जिल्ह्यात ४ नगरपरिषदा आणि ३ नगरपंचायतींसाठी ६८ पूर्णांक १४ शतांश,
नांदेडमध्ये ७४ पूर्णांक ७५ शतांश,
वाशिम जिल्ह्यात ६५ पूर्णांक ४७ शतांश,
धाराशिव जिल्ह्यातल्या ८ नगरपालिकांसाठी ६८ पूर्णांक ९७ शतांश,
जळगावमध्ये ६५ पूर्णांक ५६ शतांश,
गडचिरोलीत ७० पूर्णांक ६ दशांश,
अहिल्यानगरमध्ये ७२ पूर्णांक २५ शतांश,
सांगलीत ७५ पूर्णांक ९६ शतांश,
बुलडाण्यात ६९ पूर्णांक ४२ शतांश,
रायगडमध्ये ७० पूर्णांक २६ शतांश,
तर, सोलापूर जिल्ह्यात १० नगरपरिषदांसाठी ६७ टक्के मतदानाची नोंद झाली.
राज्यातल्या सर्व नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीची मतमोजणी येत्या २१ डिसेंबरला करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं काल दिले. सुरवातीच्या कार्यक्रमानुसार या सर्व जागांसाठीची मतमोजणी आज होणार होती.