November 9, 2025 5:46 PM | maharashtra election

printer

राज्यातल्या नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या आगामी निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरायला उद्यापासून सुरुवात

राज्यातल्या २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींच्या आगामी निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरायला उद्यापासून सुरुवात होणार आहे. १७ नोव्हेंबरपर्यंत हे अर्ज भरता येतील. अर्जांची छाननी १८ नोव्हेंबर रोजी होणार आहे. अर्ज मागे घ्यायची शेवटी मुदत २१ नोव्हेंबर ही असून उमेदवारांची अंतिम यादी २६ नोव्हेंबर रोजी जाहीर केली जाणार आहे. या निवडणुकीत एकंदर १ कोटी ७ लाख ३ हजार ५७६ मतदार, ६ हजार ८५९ सदस्य आणि २८८ अध्यक्षांची निवड करतील. निवडणुकीसाठीचं मतदान २ डिसेंबर रोजी, तर मतमोजणी ३ डिसेंबर रोजी होणार आहे.

 

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.