राज्यातल्या २३ नगर परिषदा आणि नगर पंचायतींसाठी शांततेत मतदान

राज्यातल्या २३ नगर परिषदा आणि नगर पंचायतींच्या अध्यक्ष आणि सदस्यपदांसाठी, तसंच विविध नगरपंचायतींमधल्या १४३ सदस्य-पदांसाठी आज सकाळपासून शांततेत मतदान सुरू आहे. सकाळी साडेसातला मतदान सुरुवात झाली असून साडेपाचपर्यंत ते सुरू राहणार आहे.

 

लातूर जिल्ह्यातल्या निलंगा नगरपरिषदेसाठी दुपारी दीड वाजेपर्यंत साडे ३७ टक्क्यापेक्षा जास्त, तर रेणापूर नगरपंचायतीसाठी जवळपास ४६ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.

 

पालघर नगर परिषदेसाठी दुपारी दीड वाजेपर्यंत ४० टक्के, तर वाडा नगरपंचायतीसाठी ३९ टक्के मतदान झालं आहे.

 

सांगली जिल्ह्यात शिराळा नगरपंचायतीसाठी ५३ टक्क्यापेक्षा जास्त मतदानाची नोंद झाली आहे.

 

अकोला जिल्ह्यात बाळापूर नगरपरिषदेसाठी मतदान सुरू आहे.

 

वाशिममध्ये ७५ हजारापेक्षा जास्त मतदान आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत.

 

यवतमाळ जिल्हा परिषदेसाठी मतदान सुरू आहे. अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या नगराध्यक्षपदासाठी ९ उमेदवार रिंगणात आहेत.

 

नांदेड जिल्ह्यातल्या धर्माबाद इथं मतदान सुरू असताना पैशाचं वाटप होत असल्याच्या आरोपावरून गोंधळ झाला. लग्नाच्या हॉलमध्ये कथितरीत्या काही मतदारांना अडवून ठेवल्याचं वृत्त खासगी वाहिन्यांनी दिलं होतं. मात्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी याचं खंडन केलं आहे. पोलिस आणि निवडणूक पथकानं भेट दिली असता इथं कोणीही आढळून आलं नाही, असं निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सांगितलं.