नगरपरिषदा, नगरपंचायतीसाठी शनिवारी मतदान, रविवारी मतमोजणी

नगरपरिषदा आणि नगरपंचायतीसाठी शनिवारी मतदान होत आहे आणि रविवारी मतमोजणी होणार आहे. मतदानाच्या तसंच मोजणीच्या दिवशी अनुचित घटनांना आळा घालण्यासाठी वेळीच उपाय योजना कराव्यात आणि अशा घटना घडल्या तर त्वरित कठोर कारवाई करावी, असे निर्देश राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिले आहेत.  नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांच्या तयारीसंदर्भात जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, जिल्हा पोलीस अधीक्षक आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची गेले काल आणि आज दूरचित्र संवादाच्या माध्यमातून बैठक झाली त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले.