नागालँडमधे आज २६वा हॉर्नबील उत्सव

नागालँडमधे आज २६ वा हॉर्नबील उत्सव कोहिमामधल्या किसामा इथं सुरू होत आहे. दहा दिवसांच्या या उत्सवात नागालँडमधल्या सर्व नागा जमाती एकत्र येतात. यात पारंपरिक कलाप्रकार, संगीत, लोककथा, हस्तकला आणि पाककृती यांचं प्रदर्शन केलं जातं. आज संध्याकाळी किसामा इथल्या उद्घाटन समारंभात राज्यपाल अजय कुमार भल्ला हे प्रमुख पाहुणे असतील. यंदाच्या या उत्सवात अरुणाचल प्रदेशासह ब्रिटन, फ्रान्स, ऑस्ट्रिया, मालता आणि स्वित्झर्लंड हे देश देखाली सहभागी होणार आहेत. हॉर्नबील उत्सवानिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रम साजरे केले जाणार आहेत. 

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.