August 31, 2024 9:11 AM

printer

नदीजोड प्रकल्पाची राज्य मंत्रिमंडळात घोषणा, निधीसाठी प्रस्ताव लवकरच केंद्राकडे पाठवणार – खासदार हेमंत गोडसे

नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यासाठी वरदान ठरणाऱ्या दमणगंगा-अप्पर वैतरणा-कडवा-देवलिंग या नदीजोड प्रकल्पाला जलसंपदा विभागाच्या तांत्रिक सल्लागार समितीने नुकतीच मान्यता दिली आहे. पुढच्या कार्यवाहीसाठी हा प्रस्ताव गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाकडे पाठवला असून त्यानंतर अंतिम मान्यतेसाठी हा प्रस्ताव लवकरच शासनाकडे पाठवला जाईल, अशी माहिती नाशिकचे माजी खासदार हेमंत गोडसे यांनी दिली.