केंद्रीय मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी आज नवी दिल्ली इथं श्रीलंकेचे विरोधी पक्षनेते सजिथ प्रेमदासा यांची भेट घेतली. या बैठकीत नड्डा यांनी प्रेमदासा यांना भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते तळागाळापर्यंत कसं काम करतात याबद्दल आणि भारताच्या विकास प्रवासाला आकार देणाऱ्या ‘लोक-सर्वप्रथम’ या धोरणाबद्दल माहिती दिली.
राजकीय पक्ष नागरिकांना अधिक चांगली सेवा कशी देऊ शकतील, यावर यावेळी चर्चा झाली. राजकीय पक्ष नागरिकांची सेवा कशी चांगल्या प्रकारे करू शकतात यावर चर्चा झाली. पक्ष आणि सरकारमधल्या समन्वयामुळे कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी कशी होते, हे देखील नड्डा यांनी स्पष्ट केलं.
भारत आणि श्रीलंका हे जवळचे शेजारी म्हणून नेहमीच एकमेकांना पाठिंबा देत आले आहेत, आणि परस्परांच्या विकासासाठी एकत्र काम करतील याचा पुनरुच्चार त्यांनी केला.