आर्थिक गैरव्यहार केल्याप्रकरणी ओदिशातले बिजू जनता दलाचे ज्येष्ठ नेते दिवंगत नबाकिशोर दास यांच्याशी संबंधित असलेल्या २० मालमत्तांवर आयकर विभागानं एकाच वेळी आज छापे टाकले. झारसुगुडा, संबलपूर आणि नवी दिल्लीत असलेल्या मालमत्तांवर एकाच वेळी हे छापे टाकण्यात आले आहेत.
दास यांच्या कार्यकाळात कोळसा आणि राख वाहतूक व्यवहारांमध्ये झालेली आर्थिक अनियमितता, करचुकवेगिरी आणि दास यांनी बेहिशोबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी कारवाई करण्यात केल्याची माहिती सूत्रांनी दिली.