टाटा समुहाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांना मानद नाइटहूड पुरस्कार

ब्रिटन आणि भारत यांच्यातले व्यापारी संबंध दृढ करण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल ब्रिटन सरकारनं टाटा समुहाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांना मानद नाइटहूड पुरस्कारानं सन्मानित केलं आहे. राजे चार्ल्स यांनी चंद्रशेखर यांना हा सन्मान प्रदान केला. या सन्मानाबद्दल चंद्रशेखर यांनी ब्रिटन सरकारचे आभार मानले आहेत.