म्यानमांचे कार्यकारी अध्यक्ष यू मिंट स्वे यांचं आज सकाळी राजधानी ने पि ताव इथं प्रदीर्घ आजारानं निधन झालं. ते ७४ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. आजारपणामुळेच ते गेल्या वर्षी जुलै महिन्यापासून रजेवर होते. मार्च २०१६मध्ये यू मिंट स्वे यांनी म्यानमाचे उपाध्यक्ष म्हणून शपथ घेतली होती. तत्कालीन अध्यक्ष यू विन मायंट यांना ताब्यात घेतल्यानंतर ते फेब्रुवारी २०२१मध्ये कार्यकारी अध्यक्ष झाले होते.
Site Admin | August 7, 2025 1:30 PM | Myanmar | UMyintSwe
म्यानमांचे कार्यकारी अध्यक्ष यू मिंट स्वे यांचं निधन