डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

म्यानमारमधल्या भूकंपात २७०० नागरिक मृत्यूमुखी

म्यानमारमधल्या भूकंपात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या २७०० वर पोहोचली आहे. मृतांची संख्या तीन हजाराच्या वर जाण्याची शक्यता असल्याचं म्यानमारचे लष्करी नेते मीन आँग हलैंग यांनी सांगितलं. साडे चार हजारपेक्षा जास्त नागरिक जखमी झाले असून ४४१ जण अजूनही बेपत्ता आहेत. मृतांमधे ५० विद्यार्थी आणि दोन शिक्षकांचा समावेश असल्याचं संयुक्त राष्ट्रांच्या मानवतावादी व्यवहार समन्वय कार्यालयाने म्हटलं आहे.

 

मॅनमारमधे बचावकार्य मोठ्या प्रमाणात सुरू आहे. ऑपरेशन ब्रह्मा अंतर्गत भारताने मदत पथक, वैद्यकीय पथक आणि इतर जीवनावश्यक वस्तू पाठवल्या आहेत.