डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

भुकंपामुळे जीवितहानी झाल्यानं म्यानमारमधे एक आठवड्याचा दुखवटा जाहीर

भुकंपामुळे जीवितहानी झाल्यानं म्यानमारमधे एक आठवड्याचा दुखवटा जाहीर झाला आहे. ३१ मार्च ते ६ एप्रिल या कालावधी राष्ट्रीय दुखवटा पाळला जाईल. या काळात मॅनमारचा राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकवला जाईल.  मॅनमारमधे बचावकार्य  सुरू असून आंतरराष्ट्रीय स्तरावर  मदत मागितली जात आहे. भारत, रशिया, संयुक्त अरब अमिराती आणि संयुक्त राष्ट्रांनी बचावासाठी पथकं पाठवली आहेत. संयुक्त राष्ट्रांनी जगातल्या देशांकडे ८ दशलक्ष डॉलरची मदत मागितली आहे.  

 

म्यानमारमधे भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी गेलेले भारतीय पथकं काल मंडाले इथं पोहोचले असून वैद्यकीय आणि इतर मदत पोहोचवण्यासाठी काम करत आहेत. मंडाले आणि यंगूनला अधिकची मदत पोहोचत असल्याचं यंगूनमधल्या भारतीय दुतावासाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. या भूकंपात दोन हजारपेक्षा जास्त लोक मृत्युमुखी पडले असून ३ हजार ९०० जण जखमी झाले आहेत.