October 8, 2025 8:15 PM | Myanmar

printer

म्यानमारमधे आंदोलकांवर लष्कराने केलेल्या बॉम्बहल्ल्यात २४ जणांचा मृत्यू

म्यानमारमधे सरकारविरोधी आंदोलनात सहभागी असलेल्या आंदोलकांवर लष्कराने पॅराग्लायडरने टाकलेल्या बॉम्बमुळे झालेल्या  स्फोटात २४ जणांचा मृत्यू झाला तर ४७ जण जखमी झाले आहेत. तसंच ६ ऑक्टोबर रोजी सागाईंग प्रांतात बौद्ध उत्सवासाठी जमलेल्या शंभर जणांच्या जमावावर लष्कराने हल्ला केला.