वक्फ सुधारणा विधेयकाला मुस्लिम बांधवांचं समर्थन असल्याचं मंत्री किरेन रिजिजू यांचा दावा

वक्फ सुधारणा विधेयकाबद्दल कुणाच्याही मनात कोणताही संभ्रम असण्याची गरज नाही. काही लोक या विधेयकाला विरोध करत असले, तरी बहुतेक मुस्लिम बांधवांनी या विधेयकाला समर्थन दिलं आहे, असा दावा केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी केला आहे. मुंबईत पारसी समुदायाच्या कार्यक्रमानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. देशात सर्वांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, मात्र या विधेयकाबद्दल खोट्या गोष्टी पसरवून कुणीही नागरिकांची दिशाभूल करू नये, असं आवाहन त्यांनी केलं.