राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादीवर हरकती आणि सूचना दाखल करणं, तसंच अंतिम मतदारयाद्या प्रसिद्ध करण्याला मुदतवाढ देण्यात आली आहे. यानुसार प्रारूप मतदार यादीवर हरकती आणि सूचना दाखल करण्याची अंतिम मुदत आता २७ नोव्हेंबर ऐवजी ३ डिसेंबर झाली आहे, हरकतीवर निर्णय घेऊन प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या अधिप्रमाणित करुन प्रसिध्द करण्याची मुदत ५ डिसेंबर ऐवजी १० डिसेंबर, मतदान केंद्रांच्या ठिकाणांची यादी प्रसिध्द करण्याची मुदत ८ डिसेंबर ऐवजी १५ डिसेंबर आणि मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिध्द करण्याची मुदत १२ डिसेंबर ऐवजी २२ डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे.
Site Admin | November 26, 2025 7:13 PM | Maharashtra | Municipal Elections
महानगरपालिका निवडणुकीसाठी अंतिम मतदारयाद्या प्रसिद्ध करायला मुदतवाढ