बिनविरोध उमेदवार निवडून येणं म्हणजे मतदारांचा अधिकार हिरावून घेणं – सुप्रिया सुळे

राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ७-८ वर्षांनंतर होत असूनही मोठ्या प्रमाणावर बिनविरोध उमेदवार निवडून येणं म्हणजे मतदारांचा अधिकार हिरावून घेणं आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी केलं. यात धमक्या देणं, पैशांचा वापर, उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी दबाव टाकणं, बोगस मतदान आणि मतदारांना दिली जाणारी प्रलोभनं सातत्यानं समोर येत असून निवडणूक आयोगाचं याकडे दुर्लक्ष होणं जास्त चिंताजनक आहे, असं सुळे म्हणाल्या.