उमेदवारी मागे घेण्यासाठी दबाव, निवडणूक आयोगानं मागवला अहवाल

राज्यात होत असलेल्या महानगर पालिकांच्या निवडणुकीतल्या  नामांकन प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर , उमेदवारांना आपली उमेदवारी मागे घेण्यासाठी  दबाव, प्रलोभन किंवा जबरदस्तीला बळी पडावं लागलेलं नाही, याची खात्री करून घ्यावी आणि तसा अहवाल सादर करावा, असे निर्देश निवडणूक आयोगानं संबंधित महानगर पालिकांना दिले आहेत.