महापालिका निवडणुकांचा प्रचार आज संपणार

राज्यातल्या महापालिका निवडणुकांसाठीच्या प्रचाराच्या तोफा आज संध्याकाळी साडेपाच वाजता थंडावतील. राज्यातल्या २९ महापालिकांमधल्या ८९३ प्रभागांमधल्या २ हजार ८६९ नगरसेवकांसाठी परवा मतदान होणार आहे. यासाठी एकूण १५ हजार ९३१ उमेदवार रिंगणात आहे. सकाळी साडे ७ ते साडे ५ वाजेदरम्यान हे मतदान होणार आहे. 

 

प्रचाराचा अखेरचा दिवस असल्यानं सर्व राजकीय पक्षांनी प्रचारावर लक्ष केंद्रीत केलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज नागपुरात रोड शो घेतला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत रोड शो केला तर अजित पवार पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये रोड शो करत आहेत. राज ठाकरे यांनीही आज पुण्यात प्रचार केला.