परळी नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि MIM या पक्षांनी एकत्र येऊन सत्ता स्थापन केली असल्याचा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी केला आहे. मात्र शिवसेना नेते संजय शिरसाठ यांनी हा आरोप फेटाळून लावला आहे. शिवसेनाच MIM ला हद्दपार करेल. त्यामुळं त्यांनी अधिक माहिती घ्यावी, असा सल्ला शिरसाठ यांनी दानवे यांना दिला.
या नगरपालिकेत एकूण ३५ जागा आहेत. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे १६, शिवसेनेचे २ आणि MIM चा एक नगरसेवक यांनी एकत्र येऊन गट स्थापन केला आहे. तर भाजपाचे ७ आणि २ अपक्ष वेगळ्या गटात आहेत. याशिवाय काँग्रेसचा १ आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे २ नगरसेवकांनी वेगळा गट स्थापन केला आहे.