महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी AIसह डिजिटल माध्यमांचा वापर

महाराष्ट्रातल्या महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराला आता वेग आला आहे. उमेदवार तसंच सर्व पक्षांचे नेते मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी डिजिटलं उपकरणं, तंत्रज्ञानासह विविध माध्यमांचा उपयोग करत आहेत. पदयात्रा, रॅली आणि सभा या पारंपरिक पद्धतींसह निवडणूक प्रचारात आता कृत्रिम बुद्धिमत्तेचाही समावेश झाला आहे. पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रचार करण्यासाठी भाजपाने एआयचा वापर करून केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध कल्याणकारी योजना मतदारापर्यंत पोहोचवण्याची मोहीम सुरू केली आहे. तर काँग्रेस पक्षही समाजमाध्यमाद्वारे मतदारांशी डिजिटल संपर्क साधत आहे. विविध समाजमाध्यम व्यासपीठांचा वापर करत चित्रफीत, रिल आणि मेसेजद्वारे काँग्रेसचे उमेदवार प्रचार करत आहेत. 

 

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.