महापालिका निवडणुकांसाठी ठाकरे बंधू आणि पवार कुटुंब एकत्र येण्याच्या तयारीत

पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत शरद पवार आणि अजित पवार यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रितरित्या निवडणूक लढवू शकतात, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी आज मुंबईत वार्ताहरांशी बोलताना दिली.

 

येत्या शुक्रवारपर्यंत या आघाडीची घोषणा होऊ शकते, असं अजित पवार यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली. या आघाडीत काँग्रेसही सोबत असू शकते. यासंदर्भात अजित पवार यांचा फोन आला होता, अंतिम निर्णय प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि इतर नेत्यांशी चर्चा घेऊन होईल, असं आमदार सतेज पाटील म्हणाले.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.