महानगरपालिका निवडणुकीत महायुतीने आपले उमेदवार बिनविरोध निवडून आणल्याचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी निषेध केला. हे उमेदवार लोकप्रिय आहेत, म्हणून बिनविरोध निवडलेले नसून पैसा आणि धाकदपटशाच्या जोरावर झालेले आहेत, अशी टीका सपकाळ यांनी केली आहे. मुंबईत पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कार्यालयात कार्यरत असलेले बहुतांश अधिकारी हे भ्रष्ट असल्याचा आरोपही सपकाळ यांनी केला. या संदर्भातला अहवाल मिळूनही निवडणूक आयोगाने कुठलीही कारवाई केलेली नाही, त्यामुळे या संदर्भात कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली.