महापौर पदांच्या आरक्षणाची सोडत येत्या गुरुवारी

राज्यातल्या २९ महानगरपालिकांच्या महापौर पदांचं आरक्षण निश्चित करण्यासाठी येत्या गुरुवारी मंत्रालयात सोडत काढली जाणार आहे. नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली ही सोडत काढली जाणार आहे. महापौर पदासाठी आरक्षण निश्चित झाल्यानंतर विविध महानगरपालिकामधे महापौर निवडीची प्रक्रिया सुरू होईल आणि सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग येईल. 

 

नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकांमध्ये बहुतांश ठिकाणी भाजपसह सत्ताधारी महायुतीने घवघवीत यश मिळविले आहे.