नागपूर महानगरपालिकेच्या एकूण १५१ जागांपैकी भाजपा १०४ जागांवर आघाडीवर असून काँग्रेसच्या उमेदवारांनी ३३ जागांवर आघाडी घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस ७ तर शरद पवार यांचा पक्ष एका जागेवर आघाडीवर आहेत. उद्धव ठाकरे यांच्या पक्षानं२ जागांवर आघाडी घेतली आहे. नागपूर महानगर पालिका निवडणुकीत आम आदमी पार्टी, एम आय एम आणि मनसेचे उमेदवार एक एक जागेवर आघाडीवर आहेत.
अमरावती महानगरपालिकेच्या एकूण २२ प्रभागातील ८७ जागांपैकी आतापर्यंत ६४ जागांचे निकाल घोषित झाले आहेत. भाजपानं २१ जागांवर विजय मिळवला असून राष्ट्रवादी काँग्रेसनं १३ जागांवर विजय मिळवला आहे. काँग्रेस पक्षानं १४ जागांवर विजय मिळवला आहे. उद्धव ठाकरे यांच्या पक्षानं ३ तर शिवसेनेनंही ३ जागा मिळवल्या आहेत. एमआयएमनं ६ जागा पटकावल्या असून युवा स्वाभिमानी पक्षाचे ३ उमेदवार विजयी झाले आहेत. इतर जागांसाठीची मतमोजणी सुरु असून अमरावतीत भाजपा राष्ट्रवादी बरोबर महापौरपदावर दावा दाखल करण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
अकोला महानगरपालिकेच्या २० प्रभागांमधल्या एकूण ८० जागांचेही निकाल घोषित झाले असून भाजपानं सर्वाधिक ३६ जागांवर विजय मिळवला आहे. काँग्रेस पक्ष २१ जागां मिळवत दुसऱ्या स्थानावर आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेेनं ७ तर शिवसेनेनं २ जागांवर विजय मिळवला आहे. वंचित बहुजन आघाडीनं ५, एमआयएमनं ३, राष्ट्रवादी काँग्रेसनं २ तर शरदचंद्र पवार पक्षानं २ जागा मिळवल्या आहेत. १ जागा महानगर विकास आघाडीनं तर एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत. भाजपात आता महापौरपदाच्या हालचाली तीव्र झाल्या आहेत.
चंद्रपूर महानगरपालिकेच्या एकूण १७ प्रभागातल्या ६६ जागांसाठी निवडणूक झाली. काँग्रेस जनविकास सेना या मित्रपक्षासह २० जागांवर विजय मिळवला असून भाजपानं १६ जागां मिळवल्या आहेत. एमआयएम, बसपा आणि वंचित बहुजन आघाडीचा प्रत्येकी १ उमेदवार विजयी झाला आहे.