मतदारांना भेटणं हे पूर्णतः नियमात -चंद्रशेखर बावनकुळे

मतदारांना भेटणं हे पूर्णतः नियमात असल्याचं, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही म्हटलं आहे. ते आज नागपुरात बातमीदारांशी बोलत होते. 

 

काँग्रेस आणि ठाकरे यांना पराभव निश्चित दिसत असल्यानं ते आधीच ईव्हीएमलार दोष देत आहेत, अशी टीका त्यांनी केली. 

 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुरंदर उपसा सिंचन प्रकल्पावर केलेल्या आरोपांवर बावनकुळे म्हणाले की, १९९९ ते २०२४ हा मोठा कालावधी आहे. एवढ्या वर्षांनंतर आरोप करणे योग्य नाही. जनता अशा आरोपांवर विश्वास ठेवणार नाही. ‘लाडकी बहीण’ योजनेवर काँग्रेसकडून होत असलेल्या आरोपांवरही त्यांनी जोरदार टीका केली.