राज्यातल्या २९ महानगरपालिका निवडणुकीसाठी आज मतदान झालं. सर्व महानगरपालिकांमधे मिळून सरासरी ५० टक्क्यांपर्यंत मतदान झाल्याचा अंदाज राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी व्यक्त केला. गेल्यावेळेच्या निवडणुकीपेक्षा यंदा अधिक मतदान झाल्याची माहिती त्यांनी दिली. उद्या सकाळी साडे दहा वाजता मतमोजणीला सुरुवात होणार असून ४ पर्यंत चित्र स्पष्ट होईल, असा अंदाज आहे.
दुपारी साडेतीन वाजेपर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेत सुमारे ४२ टक्के मतदान झालं. कोल्हापूर महानगरपालिकेत सर्वाधिक सुमारे ५१ टक्के तर जळगावमधे सर्वात कमी सुमारे ३४ टक्के इतकंच मतदान झालं.