April 23, 2025 4:51 PM | mumbai university

printer

मुंबई विद्यापीठाशी संलग्न महाविद्याल शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश नोंदणी सुरू

मुंबई विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयं, स्वायत्त महाविद्यालयं, मान्यताप्राप्त संस्थांमधे २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठीय पदवी अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेण्यासाठी ऑनलाईन नोंदणी सुरू झाली आहे.

 

मुंबई विद्यापीठाच्या https://mu.ac.in/admission  या संकेतस्थळावर ही नोंदणी करता येईल. पदवी परीक्षांचे निकाल जाहीर करायला सुरुवात झाली असून त्यानंतर पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू होईल, असं परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाच्या संचालिका डॉ पूजा रौंदळे यांनी सांगितलं.