डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

January 15, 2025 8:41 PM | mumbai university

printer

महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठीय आविष्कार संशोधन स्पर्धेत सलग ६व्या वर्षी मुंबई विद्यापिठाला विजेतेपद

१७ व्या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठीय आविष्कार संशोधन स्पर्धेत सलग सहाव्या वर्षी मुंबई विद्यापिठानं विजेतेपद पटकावलं आहे. लोणेरेमधल्या  डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठात १२ जानेवारीपासून आयोजित या स्पर्धेत मुंबई विद्यापीठानं ९२ गुणांसह प्रथम क्रमांक मिळवला. मुंबई विद्यापीठानं १३ सुवर्ण, ७ रौप्य आणि ३ कांस्य पदकांची कमाई केली. 

विद्यापीठाच्या ४८ पैकी २३ संशोधन प्रकल्पांना पारितोषिकं मिळाली. या संशोधन प्रकल्पांना स्टार्ट-अप मध्ये रुपांतर करण्यासाठी मुंबई विद्यापीठ विद्यार्थ्यांना सर्वतोपरी सहाय्य करेल, असं मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी सांगितलं. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.