मुंबई विद्यापीठाचा २०२६-२७ वर्षासाठीचा बृहत आराखडा काल अधिसभेत मंजूर करण्यात आला. या आराखड्यात १५ नवीन बहुविद्याशाखीय कौशल्याधारीत महाविद्यालयं आणि २ पारंपरिक उपयोजित महाविद्यालयं अशी एकूण १७ महाविद्यालयं प्रस्तावित करण्यात आली आहेत.
त्याखेरीज मुंबई विद्यापीठाचे विविध विभाग, केंद्रं, शाळा आणि संस्थांना स्वायत्त दर्जा देण्याबाबतचे परिनियम आणि विविध विभाग, संस्था आणि केंद्रातल्या विभाग प्रमुख आणि संचालकांच्या फेरपालटासंदर्भातले परिनियम अधिसभेत मंजूर करण्यात आले. त्याचबरोबर विद्यापीठाचे २०२३-२४चे वार्षिक लेखे, ३१ मार्च २०२४ चा ताळेबंद, आणि लेखापरिक्षण अहवाल मंजूर करण्यात आले.