मुंबई विद्यापीठाच्या स्थापना दिनाचं औचित्य साधून युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट रँकिंग फ्रेमवर्क पुरस्कार, प्रशासकीय गुणवत्ता अभियान आणि प्रशासकीय गुणवत्ता पुरस्कारांचं वितरण काल झालं. तसंच उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा सन्मानही यावेळी करण्यात आला.
डॉक्टर होमी भाभा राज्य विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक रजनीश कामत यांनी वर्धापनदिन व्याख्यानमालेचं ११वं पुष्प गुंफलं. या कार्यक्रमात उपस्थितांशी संवाद साधताना मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक रवींद्र कुलकर्णी यांनी या विद्यापीठाच्या उत्कर्षासाठी, गौरवशाली आणि वैभवसंपन्न परंपरेसाठी, तसंच वैश्विक स्तरावर विद्यापीठाचं स्थान उंचावण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहण्याचं आवाहन केलं.