मुंबई विद्यापीठाच्या प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणीला मुदतवाढ

मुंबई विद्यापीठाच्या प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणीला २६ मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.  विद्यापिठाच्या ३ वर्षीय पदवी अभ्यासक्रम, ४ वर्षीय ऑनर्स, ‘ऑनर्स विथ रिसर्च’, ५ वर्षीय इंटिग्रेटेड प्रोग्राम्स या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे.  मुंबई विद्यापीठाने प्रथम वर्षाच्या विविध अभ्यासक्रमांसाठी आतापर्यंत सुमारे सव्वा दोन लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, सुमारे दीड लाख विद्यार्थ्यांनी विविध अभ्यासक्रमांसाठी सुमारे ५ लाख अर्ज सादर केले आहेत.