November 7, 2024 6:57 PM | mumbai university

printer

एलएलएम प्रवेशपूर्व परीक्षा – सीबीटीच्या वेळापत्रकात बदल

मुंबई विद्यापीठातर्फे एलएलएम प्रवेशपूर्व परीक्षा – सीबीटीच्या वेळापत्रकात बदल केला आहे. ऑनलाईन माध्यमातून होणारी ही परीक्षा पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार १० नोव्हेंबरला होणार होती आता ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीनंच १७ नोव्हेंबरला विविध केंद्रावर घेतली जाणार आहे. या परीक्षेसाठी साडेचार हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीनं अर्ज सादर केले आहेत.