डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

२६/११ दहशतवादी हल्ला प्रकरणाच्या तपासामध्ये NIA सहकार्य करणार असल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही

मुंबईत झालेल्या २६/११ दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माईंड तहव्वूर राणाला भारतात आणण्यात आलं असून या प्रकरणाचा  पुढील तपास आणि कायदेशीर प्रक्रियांमध्ये राज्य सरकार राष्ट्रीय तपास संस्थेला पूर्ण सहकार्य करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.  तहव्वुर राणाला भारतात आणल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी प्रधानमंत्र्यांचे आभार मानले. या दहशतवादी हल्ल्याचा कट रचणारा म्होरक्या आपल्या ताब्यात असून तपासात आणखी काही गोष्टी उघडकीला  येतील असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.