मुंबईतल्या २६/११ हल्ल्याच्या कटात सामील असलेल्या तहव्वुर हुसेन राणाला राष्ट्रीय तपास संस्थेने आज विशेष न्यायालयासमोर हजर करून वाढीव पोलीस कोठडीची मागणी केली होती. त्यानुसार न्यायालयाने अजून १२ दिवसांची पोलीस कोठडी वाढवून दिली आहे. राणा गेले १८ दिवस राष्ट्रीय तपास संस्थेच्या ताब्यात होता आणि त्यादरम्यान मुंबई पोलिसांनीही त्याची चौकशी केली होती. चौकशीदरम्यान राणाने सहकार्य केलं नाही तसंच उडवाउडवीची उत्तरं दिल्याचं पोलिसांनी म्हटलं होतं .
Site Admin | April 28, 2025 8:48 PM
Mumbai 26/11 Attack : तहव्वूर राणाच्या पोलीस कोठडीत वाढ
