डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

December 20, 2024 7:36 PM | Mumbai Share Market

printer

शेअर बाजारात मोठी घसरण

देशातल्या शेअर बाजार आठवडाभर सुरू असलेली घसरण आजही कायम राहिली. या आठवडाभरात सेन्सेक्स ४ हजारांहून अधिक आणि निफ्टी सुमारे बाराशे अंकांनी घसरला आहे. जागतिक बाजारातली घसरण, फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर कपातीचा अपेक्षेपेक्षा कमी वेग यामुळं ही घसरण झाल्याचं विश्लेषकांचं मत आहे.

 

दिवसअखेर सेन्सेक्स १ हजार १७६ अंकांनी घसरुन ७८ हजार ४२ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही ३६४ अंकांची घसरण नोंदवत, २३ हजार ५८८ अंकांवर बंद झाला.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.