डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

May 13, 2025 1:36 PM | Mumbai Rain

printer

मुंबईत पावसाला सुरूवात

मुंबई आणि उपनगरांत आज सकाळी अवकाळी पाऊस पडला. सकाळपासूनच शहर आणि उपनगरात ढगाळ वातावरण होतं. मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरात सकाळी नऊ वाजल्यापासून अवकाळी पावसाच्या जोरदार सरी पडल्या.  भारतीय हवामान विभागानं आज आणि उद्या  यलो अलर्ट जारी केला असून, शहरात वादळी वारे, गडगडाट, आणि हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवली आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने मुंबईत अवकाळी पावसाला सुरुवात झाल्याची माहिती हवामान खात्याने दिली.