दिल्ली स्फोट प्रकरणातील आरोपीशी संबंधित असलेल्या तिघांना मुंबई पोलिसांनी अटक केली असून त्यांना चौकशीसाठी दिल्लीला पाठवण्यात आलं आहे. अटक केलेले तिघेही समाजमाध्यमाद्वारे आरोपींच्या संपर्कात होते, असं पोलिसांनी सांगितलं. या प्रकरणी राज्यातल्या इतर जिल्ह्यातही तपास सुरू आहे. या प्रकरणातील आरोप डॉक्टर उमर मोहम्मद याने तीन महिन्यांपूर्वी संभाषण करण्यासाठी समाजमाध्यमावर एक ग्रुप बनवल्याचं पोलिसांनी सांगितलं.
Site Admin | November 18, 2025 8:16 PM
दिल्ली स्फोट प्रकरणातल्या आरोपीशी संबंध असलेल्या तिघांना मुंबई पोलिसांकडून अटक