डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

प्रधानमंत्री राज्यात आले की प्रगती आणि विकासाची दार उघडतात – मुख्यमंत्री

प्रधानमंत्री राज्यात आले की प्रगती आणि विकासाची दार उघडतात. सर्व सामान्य माणसाचं आयुष्य सुखकर करणे हा मोदींचा अजेंडा आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबई इथं झालेल्या कार्यक्रमात आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबईतल्या २९ हजार ४०० कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या रस्ते, रेल्वे आणि बंदर क्षेत्राशी संबंधित विविध प्रकल्पांचे उद्घाटन, लोकार्पण, पायाभरणी झाली त्यावेळी ते बोलत होते. यात ठाणे – बोरिवली बोगदा, गोरेगाव मुलुंड लिंक रोड, कल्याण यार्डाची पुनर्रचना, नवी मुंबईमध्ये तुर्भे इथं गतिशक्ती मल्टीमोडल कार्गो टर्मिनलची निर्मिती यांची पायाभरणी याचा समावेश आहे. याशिवाय प्रधानमंत्र्यांनी राज्य सरकारच्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेला सुरुवात केली. लोकमान्य टिळक टर्मिनस इथला नवा फलाट तसंच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वरच्या विस्तारित १० आणि ११ क्रमांकाच्या फलाटाच लोकार्पण त्यांनी हस्ते झालं. 

राज्य सरकारच्या विविध प्रकल्पांचे प्रस्ताव कुठल्याही कपातीशिवाय मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्री एनाथ शिंदे यांनी प्रधानमंत्र्याचं आभार मानले. आणखी कष्ट करून आगामी विधानसभा निवडणूकीत महायुतीला विजयी करू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 

या प्रकल्पांमुळे मुंबईकरांचा वेळ वाचणार आहे. त्यामुळे गरीब कल्याणासह पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी इतिहासात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे नाव लिहिले जाईल, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी बोलताना म्हणाले. तिसऱ्यांदा प्रधानमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच राज्यात आल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रधानमंत्र्यांचं स्वागत केलं. राज्यपाल रमेश बैस, केंद्रीय मंत्री पियूष गोयल, रामदास आठवले, राज्यातले मंत्री दीपक केसरकर, मंगल प्रभात लोढा हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.