डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

मंबई मेट्रो-३वरून विमानतळावर जाण्यासाठी मोफत बससेवा

मुंबई मेट्रो-३ सेवेच्या टी-2 स्थानकापासून आंतरराष्ट्रीय विमानतळ जवळ असल्याने मुंबई मेट्रो प्राधिकरणाने विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मोफत बससेवा सुरू केली आहे. मुंबई मेट्रो रेल्वे प्राधिकरणाच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात ही माहिती दिली आहे. या बसमध्ये प्रवाशांना त्यांच्या सामानासाठी लोडर सुविधाही उपलब्ध असेल.