October 9, 2025 2:53 PM | Mumbai Metro 3

printer

मुंबई मेट्रो ३चा अखेरचा टप्पा प्रवाशांसाठी खुला

मुंबई मेट्रो ३ चा आचार्य अत्रे चौक ते कफ परेड दरम्यानचा अखेरचा टप्पा आज सकाळपासून प्रवाशांसाठी खुला झाला आहे. आज सकाळी पाच वाजून ५५ मिनिटांनी जाणारी आणि येणारी पहिली मेट्रो आरे आणि कफ परेड अशा दोन्ही स्थानकांतून रवाना झाली. तर रात्री साडे दहा वाजता शेवटची मेट्रो असेल. यामुळं मंत्रालय, विधानभवन, कफ परेड सारख्या भागात थेट मेट्रोनं जाण्याची सुविधा उपलब्ध झाल्यानं काही ठिकाणी सकाळी नागरिकांनी प्रवासासाठी गर्दी केली होती. सीएसएमटी स्थानकालगतच्या सबवेमधून थेट मेट्रोच्या स्थानकात प्रवेश करण्याची सोय यात उपलब्ध आहे. या मेट्रोच्या माध्यमातून प्रवासाचा वेळ वाचणार असून लोकल सुविधा उपलब्ध नसलेली काही ठिकाणं मेट्रोनं जोडली जाणार असल्यानं प्रवाशांमध्ये उत्साहाचं वातावरण दिसून आलं.