मुंबई मेट्रो मार्ग ३च्या बीकेसी ते आचार्य अत्रे चौक सेवेचा शुभारंभ

मुंबई मेट्रो ३ च्या बीकेसी ते वरळीमध्ये आचार्य अत्रे चौकापर्यंतच्या ९ किलोमीटरच्या पल्ल्याचं लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज झालं. या मार्गिकेचं काम अतिशय वेगानं झालं असून आचार्य अत्रे चौकापासून कफ परेडपर्यंतचा टप्पा यंदा ऑगस्ट महिन्यापर्यंत पूर्ण करून जनतेसाठी खुला करण्याचं सरकारचं ध्येय असल्याची माहिती फडणवीस यांनी यावेळी वार्ताहरांशी बोलताना दिली. ही मार्गिका अभियांत्रिकी क्षेत्रातला एक चमत्कार असल्याचं ते म्हणाले. आत्तापर्यंत सुरू असलेल्या मेट्रो मार्गिकांना चांगला प्रतिसाद मिळत असून काम पूर्ण झाल्यानंतर तो वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.