October 12, 2025 8:00 PM | Mumbai Metro

printer

मुंबई मेट्रोच्या वेळापत्रकात बदल!

मुंबईतल्या मेट्रो मार्गिका ७ आणि ९ च्या एकत्रीकरणासाठी १२ ते १८ ऑक्टोबर दरम्यान दहिसर पूर्व ते डी. एन नगर मेट्रो २ ए आणि गुंदवली ते ओवरीपाडा मेट्रो ७ या मार्गांवरच्या वेळापत्रकात तात्पुरता बदल केला आहे. आजपासून १८ तारखेपर्यंत या दोन्ही मार्गावरच्या सकाळच्या मेट्रो सेवा नेहमीपेक्षा थोड्या उशिरानं सुरू होतील. प्रवाशांनी प्रवासाचं नियोजन करताना महा मुंबई मेट्रोचं अद्ययावत वेळापत्रक तपासण्याचं आवाहन केलं आहे.