मुंबईतल्या कबुतरखान्यात कबुतरांना खायला घालू नये या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशात हस्तक्षेप करायला नकार देत कबुतरांना खायला घालणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने बृहन्मुंबई महानगरपालिकेला आज दिले. याचिकाकर्त्यांनी आदेशात बदल करण्याची विनंती उच्च न्यायालयात करावी असंही न्यायमूर्ती जे के माहेश्वरी आणि विजय बिष्णोई यांच्या पीठाने म्हटलं आहे.
कबुतरखाना पाडू नये मात्र कबुतरांना खायला घालू नये असं उच्च न्यायालयाने महानगरपालिकेला सांगितलं होतं. त्यानंतरही काही लोकांकडून कबुतराला खायला घालणं सुरूच असल्यानं अशा लोकांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत असे निर्देश न्यायालयानं ३० जुलै रोजी दिले.