December 3, 2025 2:52 PM | Mumbai Development

printer

ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह बोगद्याच्या कामाला प्रारंभ

मुंबईत ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह बोगद्याच्या कामाला आज मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. या प्रसंगी टीबीएम अर्थात बोगदा खोदणाऱ्या यंत्राचं लोकार्पणही करण्यात आलं. पूर्व द्रुतगती महामार्गापासून पश्चिम भागात जाण्यासाठी होणारी वाहतूक कोंडी तसंच, नवी मुंबई भागात जाण्यासाठी लागणारा लांबचा पल्ला कमी करण्यासाठी ऑरेंज गेट बोगद्याची संकल्पना करण्यात आली, असं मुख्यमंत्री या उद्घाटनावेळी म्हणाले.

 

या बोगद्यामुळे पूर्व द्रुतगती महामार्ग पश्चिमेला असणाऱ्या किनारी मार्गाला जोडणं शक्य होणार आहे. हा बोगदा भूमिगत असून तो पश्चिम आणि मध्य रेल्वे वाहिनी तसंच,सध्याच्या मेट्रो ३ प्रकल्पाच्याही ५० मीटर खालून तो जाईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. या प्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.