मुंबई सीमाशुल्क विभागाच्या हवाई गुप्तचर युनिटने एका कारवाईत ४ किलो ४४ ग्रॅम सोने जप्त केले. गुप्त माहितीच्या आधारे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कार्यरत दोन कर्मचाऱ्यांची झडती घेतली असतांना त्यांच्या खिश्यात वॅक्स मध्ये हे सोनं लपवलेलं आढळून आलं.
जप्त करण्यात आलेल्या सोन्याची अंदाजे किंमत ४ कोटी २४ लक्ष रुपये एवढी आहे. दोघा कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली असून पुढचा तपास सुरू आहे.