एमसीए अर्थात मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत अजिंक्य नाईक यांच्या पॅनलचा विजय झाला आहे. एमसीएच्या एकूण १६ पदांपैकी १२ पदांवर नाईक यांच्या पॅनेलचे उमेदवार निवडून आले आहेत. जितेंद्र आव्हाड हे उपाध्यक्ष पदावर निवडून आले आहेत. उन्मेष खानविलकर हे सचिव पदावर, निलेश भोसले संयुक्त सचिव पदावर तर अरमान मलिक खजिनदार पदावर निवडून आले आहेत. याशिवाय संदीप विचारे, सूरज सामंत, मिलिंद नार्वेकर हे देखील कार्यकारी समितीच्या सदस्य पदांवर निवडून आले आहेत.
Site Admin | November 13, 2025 3:35 PM | Mumbai Cricket Association Elections
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत अजिंक्य नाईक यांच्या पॅनलचा विजय